Menu
Recent Post

आलू गोबी सब्जी: आलू फुलकोबीची भाजी खूप चवदार असते आणि बहुतेकदा ती बहुतेक लग्नांमध्ये बनवली जाते, तुम्ही घरी आलू फुलकोबी भाजी कशी बनवू शकता, हे आपण आज जाणून घेऊ.


aloo kobi bhaji

आलू गोबी भाजी बनवण्यासाठी, बटाटे आणि कोबी अगोदर कापून घ्या, तुम्हाला हवे तेवढे तुकडे तुम्ही करू शकता, तुम्हाला लहान किंवा मोठे तुकडे आवडतात की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे.

    घटक Ingredients:


    Cauliflower - 250 gm 

    Potatoes - 2 

    Onion-2

    Tomato -1 

    Ginger -1/2 inch 

    garlic cloves -7

    Green chilli - 2 

    Cumin seeds -1/2 tsp 

    Bay leaves -1

    Turmeric powder -1 tsp 

    Red chilli powder -1 tbsp 

    Cooking oil- 5 tbsp 

    Coriander leaves 

    Salt to taste

    आलू गोभी भाजी कशी बनवायची


    1 ली पायरी

    सर्वप्रथम, कढईत थोडे तेल घेऊन ते गरम करावे, बटाटे आणि कोबी तळण्याइतके तेल घ्यावे लागेल. 

    अगोदर बटाटयाच्या तुकड्यानां तळून घेऊया. मग कोबीला पण तळून घेऊया. 

    गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या, त्याला चार ते पाच मिनिटे लागू शकतात, आपण त्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावा.

    पायरी 2


    आता तेलात एक तमालपत्र टाका, थोडे जिरे घाला, बारीक चिरलेला कांदा घाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा कापू शकता, जर तुम्हाला बारीक कापायचा असेल आणि तुम्हाला लांब चिरलेला कांदा आवडत असेल तर तो लांब कापून घ्या. कांदा सोनेरी होईपर्यंत परतू  द्या.


    पायरी 3


    आता मसाला तयार करा, जो चव आणखी वाढवणार आहे, थोडे सुखे धणे, थोडा चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, दोन लवंगा, काळी मिरी, अर्धा चमचा जिरे, कसूरी मेथी, अर्धा इंच आले, आठ दहा कच्ची शिंगदाणे , लसणाच्या सात कळ्या, दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करा.


    पायरी 4


    आतापर्यंत तुमचा कांदा सोनेरी झाला असेल, आता त्यात मिक्सर मधला मसाला त्यात घाला, आणि ते कमीतकमी पाच मिनिटे शिजू द्या.


    आता त्यात एक चमचा लाल तिखट घाला, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता, एक चमचा धणे पावडर टाका, एक चमचा हळद टाका आणि मसाले चांगले मिक्स करून शिजू द्या.


    ज्या भांड्यात तुम्ही मसाले घातले होते त्यात थोडे पाणी घाला आणि ते पाणी मसाल्या मध्ये टाका, आता ते झाकून ठेवा आणि सुमारे पाच मिनिटे शिजू द्या.


    पायरी 5


    आता तुम्हाला दिसेल की तुमचा मसाला चांगला शिजला आहे, म्हणून आता तुम्ही त्यात बटाटे आणि कोबी घाला आणि मिक्स करताना दोन ते तीन मिनिटे शिजू द्या.


    आता त्यात पाणी घाला, तुम्ही तुमच्या मते पाणी घालू शकता, तुम्हाला कमी ग्रेव्ही हवी असेल तर कमी पाणी घाला, आणि जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडे जास्त पाणीही घालू शकता.


    आता भाजी झाकून ठेवा आणि सुमारे पाच मिनिटे शिजू द्या, तुमची भाजी पाच मिनिटांत शिजेल आणि तयार होईल.


    आलू फुलकोबीची अप्रतिम भाजी सर्व्ह करा


    आता तुमची भाजी तयार आहे, ती गरमागरम सर्व्ह करा आणि त्यात थोडी हिरवी कोथिंबीर घाला, जेवढी सुंदर दिसेल तेवढीच तुम्हाला ती खाण्याचा आनंद मिळेल, ती खरोखरच अप्रतिम आणि चवदार बनते.


    भाज्या शिजवण्याची वेळ

    तयारीची वेळ: 10 ते 15 मिनिटे

    भाजीपाला शिजवण्याची वेळ: 22 मिनिटे

    एकूण सर्व वेळ: 30 ते 35 मिनिटे

    किती लोकांसाठी: 3 ते 4 लोकांसाठी


    आलू गोभी भाजी विडियो


     


    3

    पालक पराठा बनविण्यासाठी सर्वप्रथम पालकाला धुवून कापायचे आहे, इथे आम्ही अर्धी जुडी पालकाची घेतली आहे, पालक बारीक चिरून घेऊया, त्यात दोन वाट्या गव्हाचे पीठ टाकूया आणि दोन चम्मच बेसन घेऊया. 

    आता त्या मधे हिंग आणि एक चम्मच जीर पण टाकूया, एक चम्मच धने पॉवडर एक चम्मच लाल मिरची पॉवडर आणि मीठ  चवीनुसार घालूया.


    palak paratha marathi


    दोन इंच आलं घेऊया आणि दोन हिरव्या मिरच्या, १/४ जिरे घेऊया यांना खलबत्या मध्ये बारीक करून घेऊया. 


    आम्ही हे कुटलेले मसाले पीठात घालू, तसेच चार चमचे दुध घालू, दूध घालून आमचे पालक पराठे कुरकुरीत होतील आणि त्यांची चवही वाढेल.


    आता आपण हे मिश्रण मिक्स करू, सुरुवातीला आपण ते पाण्याशिवाय मिसळू कारण पालकतहि  पाणी असते, जेव्हा ते चांगले मिसळले जाईल, तेव्हा आपण थोडे थोडे पाणी मिसळून पीठ मळून घेऊ.


    पीठ मळून घेतल्यानंतर, आम्ही ते दहा मिनिटांसाठी सोडू.


    आता आपण पालक पराठे लाटून घ्यावे, आणि ते तव्यावर भाजून घ्यावेत, जेव्हा पराठा एका बाजूने किंचित शिजला असेल, तेव्हा तो पलटून त्यावर थोडे तेल लावावे.

    आता जेव्हा पराठा या बाजूने शिजवला जातो, तेव्हा आपल्याला दुसऱ्या बाजूला तेल लावावे लागते आणि पराठा चांगला शिजवावा लागतो.


    आता तुमचा पालक पराठा तयार आहे, ते खा आणि त्याचा आनंद घ्या. 


    साहित्य 

    1/2 जुडी पालक

    2 कप गव्हाचे  पीठ

    2 चमचे बेसन

    1/4 हिंग

    1 टीस्पून जिरे

    1 टीस्पन धनिया पावडर

    1 टीस्पून लाल तिखट

    चवीनुसार मीठ

    2 इंच आले

    2 हिरव्या मिरच्या

    1/4 टीस्पून जिरे

    4 चमचे दूध

    पराठा शेक्न्यसाठी लागणारे  तेल


    Video for Palak Paratha Recipe

     


    1

    Author

    authorHello, my name is Vandana. We make Indian Veg Recipe, Healty Recipe, A perfect guide for Cooking learners and beginners.
    Learn More →



    Labels